इंदापूर येथे सोमेश्वर आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर व उपाध्यक्ष भगवान माळशिकारे यांचा राज्यमंत्री दत्तात्रयमामा भरणे यांच्या शुभहस्ते सत्कार .
जय हिंद आजी माजी सैनिक संघटना इंदापूर तालुका प्रथम वर्धापन दिन संपन्न.
इंदापूर येथील जय हिंद आजी माजी सैनिक संघटना इंदापूर तालुका प्रथम वर्धापन दिन रविवार दि १० रोजी संपन्न झाला.प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री दत्तात्रयमामा भरणे,मा.सासने साहेब
जि.सैनिक कल्याण अधिकारी पुणे, मा.श्री.श्रीकांत पाटील सो. मा.श्री.विजयकुमार परिट सो. तहसिलदार,इंदापूर गटविकास अधिकारी प.स.इंदापूर प्रमुख मान्यवर डॉ.लक्ष्मण आसबे,मा.जयवंत नायकुडे कामधेनु सेवा परिवार संस्थापक नर्सिंग होम,इंदापूर यांच्या उपस्थितीत रविवार दि.१० एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता साई गोल्डन इव्हेंट,इंदापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी विविध जिल्ह्यातून आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते तसेच जय हिंद आजी माजी सैनिक संघटना यांनी उपस्थित सर्व सैनिक मान्यवरांचा सन्मानचिन्ह गुलाबपुष्प देत सत्कार केला.