सोमेश्वरनगर ! आज पहाटेच पावसाचे आगमन ...वातावरणात गारवा तर पाऊस पडण्याची शक्यता.
सोमेश्वरनगर - यंदा मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावली आहे. साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होणार मान्सून या वर्षी 29 मे रोजीच दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने जून महिन्यासाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.आणि खरा ठरत आज बुधवार दि 1 रोजी सोमेश्वरनगर परिसरात पहाटे अडीच वाजता आगमन झाले, त्यामुळे सकाळपासून वातावरणात चांगलाच गारवा पसरला तर सोमेश्वरनगर परिसरातील निरा, बारामती रस्ता तसेच इतर रस्त्यालगत पाणी साचले आहे तसेच काही शेतात सरी सुध्दा भरलेल्या पहायला मिळाल्या असून पावसाचे वातावरणही निर्माण झाले आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी जोराचा पाऊस पडू शकतो असे नागरिकांच्या तुन बोलले जात आहे ,पडलेल्या पावसाने शेतातील उभ्या पिकांना चांगलाच फायदा होणार आहे.