युगप्रवर्तक श्री शाहू बहुउद्देशीय सेवा संस्था इंदापूर यांच्या वतीने छत्रपती शाहूजी महाराज यांच्या 100 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
इंदापूर- छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदनानिमित्त इंदापूर पंचायात समिती सभागृह येथे राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व कार्यक्रमाचे दिप्रज्वलन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन युगप्रवर्तक श्री शाहू बहुद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी श्री भरणे म्हणाले की, छ्त्रपती शाहू महाराजांचे कार्य संपूर्ण कार्य नुसते महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला प्रेरणा देणारे आहे.आज देशात काही लोक राजकीय स्वार्थासाठी जातीय व धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. विष पेरण्याचे काम करीत आहेत पण अशा जातीयवादी व धर्मांध लोकांना छत्रपती शाहू महाराज हे एकमेव उत्तर आहे. आज म्हणून महाराजांची आठवण येते.पुढे ते म्हणाले की, युगप्रवर्तक शाहू महाराजांचे कार्य हे पाच किंवा दहा मिनिटात सांगण्यासारखे नाही. महाराज गोरगरिबांसाठी लोकराजा होते. युगप्रवर्तक श्री शाहू संस्थेचे कार्य खूप चांगले आहे. त्यामुळे तरुण पिढी, संस्था, सर्वच राजकीय पक्षांनी शाहू महाराजांच्या त्यागाचा ,कार्याचा आदर्श ठेवून काम केले पाहिजे.
यानंतर प्रा.कृष्णा ताटे म्हणाले की, महाराजांनी गोर गरीब जनतेसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण केले.त्यांनी मोठ्या शाळा , वसतिगृह, विद्यालये व दवाखाने बांधले. देशातील शोषित, पीडित लोकांना दबलेल्या जातीय चिखलातून बाहेर काढण्याचे कार्य केले. म्हणून आज शोषित वर्ग एका विशिष्ट उंचीवर आपणाला आलेला दिसून येतो.यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री संतोष खामकर , तहसीलदार श्री.श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी श्री.विजय परीट,नगरसेविका सौ. राजश्रीताई मखरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री.प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री.हुमंत कोकाटे,समता सैनिक दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री.अशोकराव पोळ, शिवसेना तालुकाध्यक्ष श्री नितीन शिंदे, शिवसेना शहराध्यक्ष मेजर श्री.महादेव सोमवंशी, नाभिक महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अरुण राऊत ,बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष श्री.हनुमंत कांबळे, भाजपा शहराध्यक्ष श्री.शकीलभाई सय्यद , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.हमीद अत्तार, नगरसेवक श्री कैलास कदम, ॲड.श्री शामराव शिंदे, श्री.विजय इंगोले, श्री.संदेश सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री. बाळासाहेब ढवळे, डॉ.विनोद राजापुरी ,श्री.असलमभाई बागवान, श्री ब्रह्मवीर जामदार,श्री.संजय खंडागळे ,श्री.शुभम पवार, आदी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन युगप्रवर्तक श्री शाहू बहुद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री.शिवाजी शिंदे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. संतोष जामदार यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष श्री.उत्तमराव गायकवाड यांनी केले. तर संस्थेचे सचिव श्री. सुहास शेवाळे, श्री. प्रवीण राऊत खजिनदार श्री. अन्वर मणियार आदींचे कार्यक्रमाचे सहकार्य लाभले