अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक संपन्न
पुणे : जिल्ह्यात आढळणाऱ्या अंमली पदार्थाचे सेवन व वापर याच्यासंदर्भात परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी तसेच अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी, अंमली पदार्थाबाबतची समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक अतिरीक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीस केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे महेश जगताप, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. माधव कनकवळे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी अंमली पदार्थ विरोधी कारवाईबाबतच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. अंमली पदार्थ विरोधी सर्व विभागांनी यासाठी समन्वयाने काम करावे, असे आवाहन श्री. पोकळे यांनी यावेळी केले.
पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी अंमली पदार्थांबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.