श्री सिद्धेश्वर हायस्कूल कोऱ्हाळे बुद्रुक येथील माजी विद्यार्थी ३८ वर्षांनी आले एकत्र.
बारामती - बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूल मधील इयत्ता दहावीतील १९८४-८५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा बुधवार दिनांक ११ मे रोजी विद्यालयाने आयोजित केला होता. या मेळाव्याला ५५ माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सर्व माजी विद्यार्थी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश मामा खोमणे उपस्थित होते. या शाळेत शिक्षण घेऊन अनेक माजी विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत असून , काही विद्यार्थ्यांनी सामाजिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला असल्याचे मत यावेळी सतीश मामा खोमणे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी dysp रामभाऊ खोमणे, शौकत भाई शेख, वृक्षमित्र अशोकराव बिचकुले, यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.