दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
पुणे : युथ फॉर जॉब्स या सामाजिक संस्थेमार्फत फक्त दिव्यांग बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे शुक्रवारी 20 मे रोजी बाल कल्याण संस्था, राज भवन जवळ, गणेश खिंड रोड, पुणे येथे सकाळी 9 ते 5 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे या उप्रकमास सहकार्य आहे.
रोजगार मेळाव्यासाठी उत्पादन, रिटेल, बीपीओ, आयटी, रत्ने आणि दागिने , हॉस्पिटॅलिटी, दूरसंचार यांसारख्या क्षेत्रातील 20 पेक्षा अधिक नामवंत उद्योजक, त्यांच्याकडील वेगवेगळ्या रिक्तपदांसह सहभाग नोंदविणार आहे. रिक्तपदे फक्त दिव्यांग उमेदवारांमधून भरली जाणार आहेत. ज्या उमेदवारांचे शिक्षण दहावी पेक्षा कमी, दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, आय.टी.आय., डिप्लोमा झालेले असेल, अशा दिव्यांग उमेदवारांना या मेळाव्याद्वारे नोकरीची संधी मिळणार आहे.
पात्रताधारक नोकरीइच्छुक दिव्यांग उमेदवारांनी https://forms.gle/zcarfZ३f६zTgUVxW६
या लिंकद्वारे आपली नोंदणी करावी. आपले आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रे, रेशन कार्ड तसेच मतदान ओळखपत्र, फोटो आणि आपल्या अर्जासह 20 मे रोजी मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित रहावे. आवश्यकता भासल्यास संस्थेचे संपर्क अधिकारी – मनस्वी-9082803687, अशिष- 9347412594 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाच्या सहायक आयुक्त कविता जावळे यांनी केले आहे.