Type Here to Get Search Results !

शिवसृष्टी मुळे येवल्याच्या सांस्कृतिक व सामाजिक वैभवात भर - पालकमंत्री छगन भुजबळ

शिवसृष्टी मुळे येवल्याच्या सांस्कृतिक व सामाजिक वैभवात भर - पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक - पालकमंत्री श्री.भुजबळ म्हणाले, आज शासनाच्या माध्यमातून येवला येथे भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, थोर स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारके व वैशिष्ट्यपूर्ण कामे उभारण्यात आली आहेत. त्यात आता 'शिवसृष्टी' च्या रूपाने येवल्याच्या सांस्कृतिक व सामाजिक वैभवात भर पडणार आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन काम केले. त्यांच्याबरोबर मुस्लिम धर्माचे लोकही होते. रायगडावर औरंगजेबच्या कबरी साठी जागा ही उपलब्ध करून दिली. महाराजांच्या  अंगरक्षकात तीन मुस्लिम होते. कुराणाचा त्यांनी नेहमी सन्मान केला. आज खऱ्या अर्थाने महाराजांचा विचार अंगीकारण्याची आपणाला गरज आहे. असेही मंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले. 

यावेळी इंडियन आयडॉल विजेते नाशिक जिल्ह्यातील कलाकार प्रतीक सोनसे, ऋषिकेश शेलार व आम्रपाली पगारे तसेच शिवसृष्टीचे वास्तू विशारद वैशाली सारंग पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. आभार कार्यकारी अभियंता पी.व्ही.पाटील यांनी मानले.

अशी असणार शिवसृष्टी

महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम व इतिहासाची आठवण करून देणारा शिवसृष्टी प्रकल्प येवल्यात लवकरच साकार होणार आहे. नाशिक-औरंगाबाद रस्त्यालगत विंचूर चौफुली जवळ ७४८६.६० चौरस मीटर जागेत 'शिवसृष्टी' उभारली जाणार आहे. नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी यापूर्वी १ कोटी ९९ लाख ३८ हजार रूपयांचा निधी मंजूर होता. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून सुधारित ३ कोटी ९९ लाख ४० हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे‌. असे एकूण ५ कोटी ९८ लाख ७८ हजार रूपयांच्या निधीत हा प्रकल्प साकार होत आहे. या प्रकल्पात श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचा १० फुट उंचीचा सिंहासनाधिष्ठीत मेघडंबरीसह पुतळा, महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना व त्यांचे सेनापती यांचे भित्तीचित्रांच्या माध्यमातून प्रदर्शन, माहिती केंद्र व कार्यालय, शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, ऑडिओ व्हिज्युअल हॉल, पुस्तक व साहित्य विक्री केंद्र, बगीचा अशा सुविधा असणार आहेत. सध्या शिवसृष्टीच्या जागेत अस्तित्वातील जीर्ण इमारत पाडणे, संरक्षक भिंत उभारणे, वाहनतळाचे क्रांक्रीटीकरण करणे, चौकीदार कक्षांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे‌ .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test