सोमेश्वरनगर ! वाणेवाडीत पार पडली इफ्तार पार्टी ; रमजान ईदच्या दिल्या शुभेच्छा
भारतीय पत्रकार संघ बारामती सदस्य यांची प्रमुख उपस्थिती
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाणेवाडी गावात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन पहायला मिळाले. भारत देश हा सर्वधर्मसमभाव असणारा एकमेव देश आहे . वाणेवाडी येथे झालेल्या इफ्तार पार्टीत सर्व धर्मातील लोक एकत्र येत ,गेले एक महिने उपवास करत असलेल्या मुस्लिम बांधवांना गोड घास भरवत त्यांना सणाच्या शुभेच्छा देत गळाभेट घेतली यामुळे एकत्रित आलेल्या बंधूंनी स्वतःचे अनुभव बोलताना सांगितले तसेच आम्हा सर्व मित्रपरिवार प्रमाणेच पुढील पिढीने देखील एकोपा जपण्याचे काम करावे असे उपस्थित पत्रकार बंधूंनी आलेल्या विविध संघटना व मुस्लिम बांधवांना यांना सांगितले.
यावेळी वाणेवाडी मुस्लिम जमात अध्यक्ष नूर मोहम्मद तांबोळी ,ग्रामपंचायत सदस्य शफिक मुलानी ,चांद आतार ,मौलाना अहमद डांगे ,मोहम्मद शेख ,शौकत शेख ,शेखलाल आतार ,शब्बीर आतार ,सलीम मुलानी सह भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका अध्यक्ष काशिनाथ पिंगळे ,उपाध्यक्ष विनोद गोलांडे ,महंमद शेख, निखील नाटकर, जितेंद्र काकडे, संजय कुंभार तसेच बहुजन सेवा संघ सोमेश्वरनगर चे उपाध्यक्ष गणेश मदने, खजिनदार किशोर हुंबरे ,विविध संघटनांनी मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीसाठी उपस्थित होते
विनोद गोलांडे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी व रमजान ईदच्या शुभेच्छा
दिल्या.