उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली बारामती येथील विकासकामांची पाहणी
बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामे उत्कृष्ट, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
श्री. पवार यांनी आज मौजे बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम, बारामती येथील पोलीस वसाहतीच्या इमारतीचे बांधकाम, दुर्गा टॉकीजच्या समोरील शॉपिंग कॉम्प्लेक्स, शादी खान येथील नदीवरील बांधकाम, बाबूजी नाईक वाडा आणि दशक्रिया विधी घाटा शेजारील कऱ्हा नदीवरील गॅबियन वॉल इत्यादी ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली.
यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अनिल बागल, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. धोडपकर आदी उपस्थित होते.