सोमेश्वरनगर ! वाढीव ऊसक्षेत्रामुळे गाळप हंगाम संपण्यास उशीर - अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप
१२ लाख ९० हजार मे.टन ऊसाचे गाळप पुर्ण.
संपुर्ण ऊसक्षेत्राचे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही. सभासदांनी काळजी करु नये
सोमेश्वरनगर - श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालु गळीत हंगामाकरीता कारखान्याने आजअखेर १२ लाख ९० हजार मे.टन ऊसाचे गाळप पुर्ण केले असुन यातुन सरासरी ११.७५ टक्केचा साखर उतारा राखत १५ लाख १० हजार साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. या संपुर्ण ऊसाचे आपण १९९ दिवसात गाळप केले असुन सरासरी आपण प्रतीदिन ६४८५ मे.टन ऊसाचे गाळप केले आहे. अदयापही आपल्या कारखान्याचा
गाळप हंगाम सुरु असुन आपण संपुर्ण ऊसक्षेत्राचे गाळप संपवल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही याबाबत पुर्वीच घोषणा केली आहे. कार्यक्षेत्रातील वाढलेले ऊसक्षेत्र व त्याचसोबत बिगर नोंदिचाही ऊस आपण गाळप केल्याने आपला गाळप हंगाम संपण्यास ऊशीर होत असल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, आजखेर
आपण आडसाली ८ लाख ५२ हजार मे.टन ऊसाचे गाळप केले असुन संपुर्ण आडसाली ऊसाचे गाळप करण्याकरीता गाळप क्षमतेचा विचार करीता ४ महिन्यांपेक्षा ज्यादा कालावधी लागला त्यामुळे त्यानंतर लागवड करणेत आलेल्या पुर्वहंगामी ,सुरु, खोडवा या ऊसासतोडीसही विलंब होत
गेला. तसेच जगताप पुढे म्हणाले की, आपण याबाबत पुरंदर तालुक्याचाच विचार केला तर, एकट्या पुरंदर तालुक्यातुन गाळप हंगाम सन २०१७-१८ या हंगामात २ लाख २२ हजार ४३५ मे.टन, गाळप हंगाम सन २०१८-१९ या हंगामात ३ लाख १५ हजार ७९५ मे.टन, गाळप हंगाम सन २०१९-२० या हंगामात २ लाख ७७ हजार ७३३ मे.टन, गाळप हंगाम सन २०२०-२१ या हंगामात ४ लाख ८ हजार १०२ मे.टन तर चालु गाळप हंगामात ४ लाख ७७ हजार १८१ मे.टन ऊस आपल्या कारखान्यास गाळपास आला असुन गेल्या चार वर्षाची सरासरी पाहता जवळपास दुप्पटीने ऊसक्षेत्र
पुरंदर तालुक्याचेच वाढले असुन अशी परिस्थिती संपुर्ण कार्यक्षेत्रातच आहे. आपण कारखाना सुरु होण्यापुर्वी नोंदिचा व बिगर नोंदिचा मिळुन सुमारे १७ लाख मे.टन ऊस कार्यक्षेत्रात उपलब्ध होता. त्यामुळे कारखान्याची प्रतिदीन गाळप क्षमतेचा विचार करुन बिगर नोंदिचा ऊस गाळपास आणणार नाही असे जाहिर केले होते परंतु नंतर मार्च महिन्यापर्यंत १७ लाख मे.टनातुन सुमारे ३ ते ३.५ लाख मे.टन ऊस इतर कारखान्यांना गाळपासाठी गेल्याची माहिती उपलब्ध झाल्यामुळे आपण संचालक मंडळाच्या बैठकीत आपणबिगर नोंदिचाही ऊस गाळपास आणण्याचा निर्णय मार्च माहिन्यात घेतला.त्यामुळे बिगर नोंदिचा ऊस व ज्यादा ऊसक्षेत्रामुळे आपला गाळप हंगाम संपण्यास उशिर होत आहे.जगताप पुढे म्हणाले की, ऊसक्षेत्रात वाढ झाली असली तरी या संपुर्ण ऊसक्षेत्राचे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही. त्यामुळे सभासदांनी काळजी करु नये असे आवाहन मी करतो.