सोमेश्वरनगर ! मु सा काकडे महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.
सोमेश्वरनगर - आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे. २८ मे १८८३ रोजी नाशिकच्या भगूर येथे त्यांचा जम्न झाला होता. सावरकर हे भारतातील महान क्रांतिकारकांपैकी एक होते. ब्रिटिशांविरोधातील कारवायांमुळे त्यांना दोन वेळा जन्मठेप सुनावण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांना सामाजिक रुढी परंपरांविरोधात मोठे काम केले होते.
बारामती तालुक्यातील मु सा काकडे महाविद्यालय सोमेश्वर नगर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी
प्राचार्य देविदास वायदंडे,सह.सचिव सतिश लकडे,उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे,डॉ. संजू जाधव ,प्रा. आर.एस जगताप, प्रा.राहुल गोलांडे, विनायक आगम, अमोल काकडे सह सेवक वर्ग उपस्थित होते.