एकरी १०० टन ऊस उत्पादन अभियान” शुभारंभ व शेतकरी मेळाव्याचे आयोजन
बारामती : “एकरी १०० टन ऊस उत्पादन अभियान शुभारंभ व शेतकरी मेळाव्याचे आयोजन शनिवार दिनांक ७ मे रोजी सकाळी १०.३० वा. माळेगाव इंजिनिअरींग कॉलेजच्या "शरद सभागृहामध्ये" करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे
या शेतकरी मेळाव्यास ऊस संशोधन केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. भरत रासकर व कृषि महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. धरमेंद्रकुमार फाळके मार्गदर्शन करणार आहेत.
शेतकरी मेळाव्यास बारामती, दौंड, इंदापूर व पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.