Type Here to Get Search Results !

पोलीस असल्याची बतावणी करून वृध्द इसमास लुटणाऱ्या सराईत आरोपीस वडगाव निंबाळकरपोलीसांनी केली अटक व १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे तीन तोळे सोने केले जप्त.

पोलीस असल्याची बतावणी करून वृध्द इसमास लुटणाऱ्या सराईत आरोपीस वडगाव निंबाळकर पोलीसांनी केली अटक व १ लाख ५० हजार रुपये  किंमतीचे तीन तोळे सोने केले जप्त. 

सोमेश्वरनगर -  वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत दिनांक १७/०२/२०२२ रोजी सकाळी च्या सुमारास मौजे वडगाव निंबाळकर ता. बारामती जि पुणे या गावात वडगाव निबाळकर ते कोहाळे खु। रोडवर अज्ञात इसमाने फिर्यादीस पोलीस असल्याची बतावणी करून त्यांचे खिश्यातील मोबाईल पॉकिट, चावी, व सोन्याची चैन रूमालात बांधायचे भासवून हात चलाखीने सोन्याची चैन रूमालात बांधुन न ठेवता फसवुन १,५०,००० / -रू किंमतीचे फिर्यादीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे चैन व पेंडल घेऊन गेला होता. वगैरे फिर्यादी वरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६९/ २०२२ मा.द.वि. ४२०, १७० प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्हयाचे तपासात फिर्यादीने अज्ञात आरोपींचे सांगितले वर्णनावरून आरोपी कोणत्या दिशेने फरार झाला असेल याची माहीती मिळणे कामी वडगाव निंबाळकर वे सासवड ता पुरंदर पर्यंत खुप मोठया प्रमाणात सी.सी.टी. व्ही कॅमेरांची पडताळणी करुन, सी.सी.टी.व्ही कॅमेरा, तांत्रिक माहीती व गोपनीय माहीतीच्या आधारे संशयित आरोपी अबालु जाफर इराणी रा शिवाजीनगर, पुणे हा निष्पन्न झालेला होता. सदरचा आरोपी हा गुन्हा घडलेपासुन हा परराज्यात फरार होता. सदरचा आरोपीस कराड शहर पोलीस स्टेशन, जिल्हा सातारा येथे गुन्हयात अटक करण्यात आली होती. त्यास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे वरिल प्रमाणे दाखल गुन्हयात सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केलेचे सांगुन त्याने गुन्हयात फसवुन घेवुन गेलेले १ लाख ५० हजार रु किंमतीचे तीन तोळे वजनाची सोन्याची चैन व पेंडल सर्व मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपीवर या यापुर्वी १५ गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी ही.डॉ. अभिनव देशमुख सो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण,मिलिंद मोहिते सो. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग. गणेश इंगळे सो. उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, तसेच . अशोक शेळके साो. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी  सोमनाथ लांडे (सहा. पोलीस निरीक्षक)तसेच तपासी अंमलदार पो.हवा. महेंद्र फणसे, पो.ना सागर चौधरी, पोना ज्ञानेश्वर सानप, पोना. कुंडलिक कडवळे,पो.कॉ. पोपट नाळे, अमोल भुजबळ, विलास ओमासे पोना राहुल होळकर शिवाजीनगर, पोलीस स्टेशन यांनीकेलेली आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार पो.हवा.महेंद्र फणसे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test