Type Here to Get Search Results !

महत्वाची बातमी ! अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने अन्न व्यवसायिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन

महत्वाची बातमी ! अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने अन्न व्यवसायिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन
पुणे, दि. 24: अन्न व औषध प्रशासन व मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज व अग्रिकल्चर (एमसीसीआयए) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उपहारगृह, रेस्टॉरंट, केटरिंग व्यवसायिक, मिठाई, फरसाण, खाद्यतेल उत्पादक व दुध प्रकिया व्यवसायिकासाठी 'फोर्टीफिकेशन, रिपर्पोज युज्ड कुकिंग ऑइल (आरयुसीओ) अभियान, सरप्लस फुड अँड हायजिन रेटींग' याबाबत जागृती करण्यासाठी एमसीसीआयएच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शिवाजी देसाई, एमसीसीआयएच्या अन्न प्रकिया समितीचे अध्यक्ष आनंद बोरडीया, एफएसएसएआय पूर्व विभागाचे संचालक कर्नल श्री. दहीतुले आदी उपस्थित होते. 

यावेळी केएचपीटीचे जालिंदर शिंदे यांनी फोर्टीफिकेशनबाबत, सहायक आयुक्त श्री.देसाई यांनी आरयुसीओ तर अन्न सुरक्षा अधिकारी सोपान इंगळे यांनी 'हायजिन व सरप्लस फुड' बाबत संगणकीय सादरीकरण करून मार्गदर्शन केले. यापुढेही अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन करण्याचे नियोजन असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. 

व्यवसायिक प्रतिनिधी श्रीकृष्ण चितळे, रवी बुधानी, किशोर सरपोतदार यांनी उपस्थितीत केलेल्या शंकांचे प्रशासनाकडून निरसन करण्यात आले. यावेळी विविध व्यवसायिकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी सहायक आयुक्त सं. भा. नारगुडे, बा. म. ठाकुर, सी. ए. देसाई, श्री. रा. करकले, र.भि. कुलकर्णी, सु. श. क्षीरसागर, ग. पां. कोकणे, रा. र. काकडे, अन्न सुरक्षा अधिकारी वि. अ. उनवणे. अ. ग. गायकवाड, सो. ह. इंगळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test