Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा
 
सोमेश्वरनगर -सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयात माजी विद्यार्थी आर.एन.शिंदे सभागृहात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी उपस्थित प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या. वरिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ.बाळासाहेब मरगजे यांनी   उपस्थित शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सह विविध आसने प्राणायाम योगा यांचे प्रात्यक्षिक करून योगामुळे मानसिक व शारीरिक विकास होउन व्यक्तिमत्व विकास होतो तसेच योगाचे जीवनातील महत्व सांगितले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे सह-सचिव श्री सतीश लकडे,उपप्राचार्य डॉ.जगन्नाथ साळवे, जया कदम,प्रवीण ताटे-देशमुख, आर.डी.गायकवाड, आय क्यू ए सी समन्वयक संजू जाधव तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष सतीशराव काकडे-देशमुख व सचिव प्रा.जयवंतराव घोरपडे यांनी महाविद्यालयात साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. दत्तराज जगताप यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test