पुरंदर ! शटल बससेवेने आगाराचे उत्पन्न वाढणार-भुजबळ
पुरंदर प्रतिनिधी मध्यंतरीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एस. टी. महामंडळ पुर्णतः तोट्यात गेले होते.मात्र सद्य स्थितीत सर्वसामान्यांची लालपरी चोहुकडे धावू लागली असून नव्याने सुरू झालेल्या शटल बससेवेने तर आगाराच्या उत्पन्नात वाढ होऊन एसटी महामंडळाचे देखील नुकसान भरून निघण्यास कमालीची मदत होणार असल्याचा आशावाद युवासेना पुरंदरचे उपतालुकप्रमुख सागर भुजबळ यांनी व्यक्त केला.
वाल्हे ( ता. पुरंदर ) येथे प्रवाशांच्या मागणीवरून सासवड आगाराने सुरू केलेल्या निरा स्वारगेट शटल बसचे स्वागत युवा नेते सागर भुजबळ यांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून मोठ्या जल्लोषात करण्यात आले.या दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांशी हितगुज करताना सागर भुजबळ हे बोलत होते.ते पुढे म्हणाले शटल बससेवेचा फायदा विद्यार्थी वर्गासह कामगार,व्यापारी, शेतकरी तसेच सर्वसामान्य प्रवासी वर्गाला होणार असल्याने तालुक्यातील अर्थव्यवस्थेची चक्रे देखील गतिमान होणार आहेत.
याप्रसंगी वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले माजी उपसरपंच सूर्यकांत भुजबळ चंद्रशेखर दुर्गाडे सामाजिक कार्यकर्ते हनुमंत पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे त्रिंबक भुजबळ संभाजी पवार दीपक कुमठेकर शिवसेनेचे भाऊ मदने विनोद पवार काँग्रेसचे बजरंग पवार भाजपचे चंद्रकांत सासवडे शिवप्रताप माथाडीचे जिल्हा सचिव निलेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.