सोमेश्वरनगर ! वाघळवाडी ग्रामपंचायतीचा चाळीस वर्षाचा बॅकलॉक भरून निघाल्याचे खूपत असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक डोळ्या समोर ठेवून पडू लागलाय तक्रारिंचा पाऊस ...
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत वाघळवाडीतील विविध विकास कामे आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न पूर्ण करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत असून गावातील ४० वर्षाच्या प्रलंबित कामाचा बॅक लॉक भरून निघाला आहे. गावचा झालेला कायापालट खुपत असल्यानेच तक्रारीचा पाऊस पडू लागलाय. ही वस्तुस्थिती आहे.।
विकास कामांची यशोगाथा पाहता दर्जेदार व नियमानुसार केलेली विकास कामे बघवत नसल्यानेच ग्रामपंचायत मध्ये न भूतो ना भविष्य केलेल्या विकास कामांची यशोगाथा पहाता हतबल झालेल्यानी आरोप करून वरिष्ठ पातळीवर तक्रार करून ग्रामपंचायतीला कसे अडचणीत आणता येईल याचा प्रयत्न करत आहेत.
तर काही जेष्ठ नेते गावातील युवकांना भडकावून तक्रार करायला सांगून त्या तक्रारदारांच्या आडूण गावातील विकास कामे कसे थांबतील यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु गावातील नागरिक सध्या विकास कामे होत असल्याने समाधानी व जागृत आहेत. बारामती तालुका व सोमेश्वर पंचक्रोशी मध्ये विकासकामांमध्ये वाघळवाडी चे नाव उंचावत आहे आहे. युवकांनी गावचा विकास केलाय हेही ध्यान्यात घ्यावे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत असलेली विकास कामे ही नियमानुसार सुरू असून अंदाजपत्रक देण्यासाठी जि जिल्हा परिषद व पंचायत समिती यांनी संबंधित अधिकारी नेमलेले असतात. त्यांना अंदाजपत्रक बनविण्याचे अधिकार असतात तर झालेल्या कामाचे मूल्यांकन करण्याचा अधिकार सुद्धा त्यांनाच असतो. जि प व पं स यांनी दिलेल्या कामाच्या मूल्याकन नुसारच ग्रामपंचायत बिल देते. म्हणजेच पूर्णपणे कामाची प्रक्रिया राबवून चौकशी करूनच बिले दिली जात आहेत. त्यामुळे बिनबुडाचे तथ्य नसलेले आरोप करू नयेत. व विरोधासाठी उगाच विरोध करू नये. नागरिकांच्या समस्या, अडचणी, वैयक्तिक कामे करून आपली ताकद दाखवून द्यावी व ओळख निर्माण करावी.
गेल्या चार वर्षात गावात सर्वत्र पेवर ब्लॉक, डांबरीकरण, सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते , भूमिगत गटर, पिण्याच्या पाण्याच्या उंच टाक्या, सर्वत्र वितरण पाईपलाईन विहीर दुरुस्ती, मंदिराचे सभामंडप, ८.३० प्राथमिक आरोग्य केंद्र, २१ कोटीची स्वच्छ पाणी पुरवठा योजना, वनउद्यान आणि गेली ४० ते ५० वर्षे प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीचा प्रश्न बांधकाम पूर्ण झाल्याने तो सुध्दा संपला ४० ते ५० वर्षापासून पिढ्यानपिढ्या असणारा सांडपाण्याचा प्रश्न गावातील युवकांनी पुढाकार घेऊन सोडवला आहे तसेच रस्ता, भूमिगत गटार, सभामंडप इतर विकास कामे करताना नागरिकांच्या आपापसातले वाद मिटवून गावातील चांगले प्रकारचे कामे होत असल्याने आणि काही दिवसांवर आलेली ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकीय आरोपाचे वारे वाहू लागले आहेत. झालेली विकास कामे दिसत असल्याने वैयक्तिक लाभाच्या योजना दारोदारी पोचल्याने तसेच महिला साठी व्यवसाय प्रशिक्षण, अभ्यास दौरा, विधवा, परितक्त्या, यांना श्रावणबाळ, संजय गांधी वैयक्तिक योजनेतून पैसे मिळवून दिले तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून गावातील जवळपास ३५० ते ४०० महिलांसाठी ३५ बचत गट स्थापन करून ६० लाख रुपये पर्यंतचे शून्य (०) टक्के कर्ज वाटप केले या सर्व कामांमुळे व गावातील न भूतो न भविष्यती कामांचा इतिहास झाल्याने गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक व सर्व ग्रामस्थ समाधान व्यक्त करत असून आपण काहीच काम केले नाहीत येत्या निवडणूकीला लोकांच्या समोर कोणत्या आधारे जायचे हा प्रश्न पडल्यानेच लोकांना खोट- नाट सांगण्याचा केविलवाणा प्रकार रोज सुरू आहे.