बारामती पंचायत समितीच्यावतीने ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा
बारामती : शिवस्वराज्य दिनानिमित्त पंचायत समितीच्या प्रांगणात गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन व स्वराज्य गुढी उभारण्यात आली.
पंचायत समिती, बारामतीच्या प्रांगणात आज झालेल्या शिवस्वराज्य दिन कार्यक्रमास सहायक गट विकास अधिकारी अभिमान माने यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने झाली.