Type Here to Get Search Results !

नाशिक ! आरोग्य विद्यापीठाची सर्व विभागीय कार्यालये अधिक सक्षम होणार

नाशिक ! आरोग्य विद्यापीठाची सर्व विभागीय कार्यालये अधिक सक्षम होणार
नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, लातूर व कोल्हापूर येथील विभागीय कार्यालय प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजासाठी अधिक सक्षम होणार आहेत. यासाठी विद्यापीठाचे विभागीय कार्यालय जवळच्या संलग्तित महाविद्यालयांशी जोडण्यात     आली आहेत.
       विद्यापीठाचे मा. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, आरोग्य शिक्षणाच्या विविध विद्याशाखांचे राज्यातील सुमारे 410 पेक्षा अधिक महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित आहेत. 
मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, लातूर व कोल्हापूर येथे विद्यापीठाची विभागीय कार्यालय कार्यान्वीत आहेत. विविध प्रशासकीय, शैक्षणिक व परीक्षाविषयक कामकाजासाठी विभागीय कार्यलये सक्षम करण्यात आली आहेत. विद्यार्थी, शिक्षक, पालक व अभ्यांगतांना प्रशासकीय कामकाज करतांना अंतर सोईचे व्हावे तसेच विद्यार्थ्यांना दैनंदिन सामन्य कामाकरीता नाशिक मुख्यालयात येण्याची गरज पडू नये याकरीता विभागीय कार्यालये अधिक सक्षम करण्यात आली आहेत. याव्दारा सर्वांचा वेळ, पैसा आणि श्रम याची बचत होईल असा विद्यापीठाचा मानस आहे.          
       ते पुढे म्हणाले की, विद्यापीठाचे www.muhs.ac.in    संकेतस्थळावर परिपत्रक क्र. 01/2022 मध्ये स्थानिक महाविद्यालय कोणत्या विभागीय केंद्राशी जोडण्यात आली आहेत यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी सदर यादीमध्ये काही बदल अथवा सुधारणा असल्यास विद्यापीठास कळविण्यात याव्यात जेणेकरुन योग्य बदल करणे सुकर होईल असेही त्यांनी सांगितले.
      महाविद्यालय जवळच्या विभागीय केंद्राशी जोडण्याबाबत सर्व संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता व प्राचार्य यांना विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे. तसेच याबाबत अभ्यागतांनी आपल्या प्रतिक्रिया विद्यापीठास administration@muhs.ac.in      या ई-मेल पत्त्यावर पाठविण्यात याव्यात असे विद्यापीठाकडून आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test