रास्तभाव दुकान परवान्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार
पुणे : पुणे जिल्हा ग्रामीणमधील १३ तालुक्यातील ३५७ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूरी बाबतचा जाहीरनामा १ जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार असून परवान्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
जाहीरनाम्यातील सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना फॉर्म इत्यादीबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://pune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. तसेच संबंधीत तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत
स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज १ जुलै ते ३१ जुलै २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत करता येतील आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी कळविले आहे.