सोमेश्वरनगर ! बारामती सराफ असोसिएशनच्या अध्यक्षपदी किरण आळंदीकर.
आळंदीकर यांची अध्यक्ष पदाची हॅट्रिक
बारामती येथे हॉटेल कृष्णसागर येथे बारामती सराफ असोसिएशन च्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. सभेला बारामतीसह, कर्जत,इंदापूर, दौंड, पुरंदर, खंडाळा, माळशिरस, श्रीगोंदा, कोरेगाव तालुक्यातील सभासद उपस्थित होते यावेळी असोसिएशन च्या अध्यक्षपदी किरण आळंदीकर यांची उपाध्यक्ष पदी किशोर शहा यांची तर कार्याध्यक्ष पदी सुधीर पोतदार यांची निवड करण्यात आली.
संतोष बागडे, गणेश जोजारे, प्रतीक जोजारे, अँड. गणेश आळंदीकर, ओंकार मैड, रेवती बोकन, गणेश मैड, लोहितक्ष बन्छोड, अनुज कुलथे,सुधीर पोतदार यांची विविध क्षेत्रात निवड झालेबद्दल आणि उल्लेखनीय कामगिरी बद्दल सत्कार करण्यात आला तर किरण आळंदीकर यांची इंडिया बुलिअन अँड ज्वेलर्स असोसिएशन च्या राज्य समन्वयक पदी निवड झालेबद्दल सर्व सभासदांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
निवड झालेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे..
सचिव - ए. बी. होनमाने, खजिनदार - गणेश बनछोड, कायदेशीर सल्लागार - अँड. गणेश आळंदीकर, सल्लागार - शांतिकुमार सराफ, नानासाहेब गटगिळे.
कार्यकारिणी सदस्य - प्रकाश अदापुरे, रघुनाथ बागडे, शिवाजी क्षीरसागर, सुधाकर त्यारे, योगेश गटगिळे, दिपक आळंदीकर, महेश ओसवाल, प्रवीण पळसकर, गोकुळ लोळगे, गणेश जोजारे, दिनेश लोळगे, बाळासाहेब पवार.