विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल
सी.बी.एस.ई. सोमेश्वर या शाळेचा दहावी व बारावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल सी.बी.एस.ई. सोमेश्वर या शाळेचा दहावी व बारावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून, या शाळेतील सी.बी.एस.सी बोर्डची १० वी ची यावर्षी तिसरी बॅच तर १२ वी ची पहिलीच बॅच होती. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक तुरा खाऊला गेला. १० वीच्या परीक्षेत कु. सई सचिन
विद्यार्थिनीने ९९.२० टक्के मार्क मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले कु. सिद्धेश सुभाषचंद्र माने ९६ टक्के व तृतीय क्रमांकाचा कु. साहिल विनोद दरेकर याने ९५.८ टक्के गुण मिळवत मान पटकविला. तसेच कु. सई सचिन भोसले व कु. श्रेयस दिलीप निगडे यांनी मराठी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून यश संपादन केले. या १२ वी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक कु. वैष्णवी सुरेश आहेरकर ८६.२ टक्के, तसेच कु. निखिल किशोर महामुनी या विद्यार्थ्याने ८३.२ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला तर तृतीय
क्रमांकाचे दोन मानकरी ठरले. कु. श्रुती पांडुरंग बोबडे व कु. मानसी विठ्ठल यादव यांनी ८२.८ टक्के गुण प्राप्त केले. या मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. अशोक प्रभुणे, सचिव मा. अॅड नीलिमा गुजर, विश्वस्त मा. सौ. सुनेत्रा पवार, खजिनदार मा. श्री. योगेंद्र पवार व सर्व विश्वस्त मंडळ विद्या प्रतिष्ठान, बारामती यांनी विद्यार्थ्याचे व शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल
सीबीएससी दहावी व बारावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल.