Type Here to Get Search Results !

बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून राजेंद्र केसकर..

बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून राजेंद्र केसकर..
बारामती प्रतिनिधी दिगंबर पडकर 
बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून आज राजेंद्र केसकर यांनी पदभार स्वीकारला. केसकर बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत होते. येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांचा सेवा कार्यकाळ संपून नुकतेच निवृत्त झाले. राजेंद्र केसकर यांची सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदावरून बढती होऊन बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला.


राजेंद्र केसकर यांनी बारामतीत.... या कार्यकाळात प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून ही कामकाज पाहिले आहे. या काळात त्यांनी वाहन चालक-मालक यांच्या विविध समस्या सोडवण्याबरोबरच बारामती, इंदापूर, दौंड येथील वाहन मालक व चालक यांची अनेक कामे मार्गी लावली. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे केसकर यांचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते. आत्ता केसकर यांनी बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्याने तिन्ही तालुक्यातील वाहनचालक व मालक यांच्याकडून आनंद व्यक्त केला जात आहे.


बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात केसकर यांनी प्रभारी म्हणून काम करताना त्यांच्या कामाची दखल घेऊन परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले होते. बारामतीतील एका ९८ वर्षीय ज्येष्ठाच्या वाहन हस्तांतरणाच्या कामासाठी त्यांना आरटीओ कार्यालयापर्यंत येणे शक्य होत नव्हते. ही बाब केसकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आपल्या पदाचा कोणताही बडेजाव न करता थेट त्या ज्येष्ठच्या घरी जाऊन वाहन हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावला. अशाप्रकारे काम करणारे केसकर हे बारामतीतील पहिलेच अधिकारी आहेत. याच कार्याबद्दल त्यांना परिवहन आयुक्त ढाकणे यांच्याकडून शाब्बासकीची थाप मिळाली. आपल्या चोख कार्यपद्धतीमुळे बारामती परिवहन कार्यालयाच्या अख्यारीतील बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यातील वाहन चालक मालक यांच्या परिचयाचे असणारे केसकर सध्या बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रमुख झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test