बारामती ! सायंबाच्यावाडीतील श्वान स्पर्धेची प्रथम मानकरी ठरली 'फिनिश गर्ल'
पुणे जिल्ह्यात प्रथमच श्वान (कुत्र्याची) स्पर्धा
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी याठिकाणी स्व. तुकाराम भापकर प्रतिष्ठान
यांच्यावतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. ११ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रोख रकमेच्या डर्बीझ, श्वान (कुत्र्यांच्या) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वाई येथील रेसिंग क्लबची फिनिश गर्ले ही
प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. यावेळी त्यांना रोख रक्कम ६६ हजार ६६६ रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, आयोजक खड़की छावणी परिषदेचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर व मान्यवर
यांच्या हस्ते देण्यात आले. या स्पर्धेत दोनशे श्वानांनी सहभाग नोंदवला होता. इतरही स्पर्धक विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
हिंदवी स्वराज्य ग्रुप, शिवजयंती महोत्सव समिती सायंबाचीवाडी व हंटर ग्रुप पुसेगाव यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले. या श्वान शर्यत मैदानावर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून स्पर्धक व प्रेक्षक सहभागी झाले होते.