Type Here to Get Search Results !

पुणे ! जिल्हास्तरीय नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन

पुणे ! जिल्हास्तरीय नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन
 
पुणे -  जिल्हास्तरीय नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धेचे १० ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी १ ते ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या निर्देशानुसार २०२२-२३ या वर्षात राष्ट्रीय स्तरावरील नेहरू कप स्पर्धेचे आयोजन २ सप्टेंबर २०२२ पासून नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा तसेच विभागस्तरावरील स्पर्धेचे आयोजन १२ ऑगस्ट २०२२ पूर्वी करण्यात येणार आहे. २०२२-२३ या वर्षातील जिल्हास्तरावरील स्पर्धा १० ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.

 सब ज्युनियर गटासाठी जन्मतारिख १ नोव्हेंबर २००७ किंवा त्यानंतरची असावी. १७ वर्षे मुलांच्या व मुलींच्या  ज्युनियर गटासाठी जन्मतारिख १ नोव्हेंबर २००५ किंवा त्यानंतरची असावी.

जिल्हास्तरावर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात क्रीडा विभाग, पिंपरी चिंचवड मनपा, १५ प्रेमलोक पार्क चिंचवड येथे, पुणे महानगरपालिका व पुणे ग्रामीण क्षेत्रात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शास्त्रीनगर, येरवडा येथे १ ते ५ ऑगसट सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा स्तरावर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी क्रीडा अधिकारी अनिता केदारी-९३७०१७९६८४, पुणे महानगरपालिका क्षेत्रासाठी  क्रीडा अधिकारी अतुल माने-९८२२९८६११२ तर पुणे ग्रामीणसाठी क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे-८८८८८७०८८० यांना स्पर्धेसंदर्भात संपर्क साधावा. जिल्हास्तरावर अधिकाधिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. कसगावडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test