बारामती ! कसबा येथील मुकबधीर शाळेतील दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्य व खाऊ वाटप
बारामती : बारामती शहर व तालुका प्रहार दिव्यागं संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्य मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील कसबा येथील मुकबधीर शाळेतील दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रहार संघटना सदैव तत्पर असते आपल्या विद्यालयातील दिव्यांगांच्या काही अडचणी असतील तर त्यांनी संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेचे तालुकाध्यक्ष मृत्युंजय सावंत यांनी यावेळी केले
यावेळी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष दिपक शिंदे,तालुका महिला अध्यक्ष शोभाताई तावरे,तालुका कार्याध्यक्ष सचिन भापकर,संजय यादव,शिवाजी खोमणे,संजय बडलकर,संजय यादव,विजय तावरे,शिवाजी गोसावी,गणेश केंगार,गणपत गोले,शहर अध्यक्ष मयुर साबळे,शहर उपाध्यक्ष निलेश गवारे,शहर कार्याध्यक्ष मनोज कोमकर,बाळासाहेब रजपूत,शहर महिला अध्यक्ष शारदाताई जगताप,शहर उपाध्यक्ष आनिताताई भालेकर, ज्योतीताई अहिवळे यांच्यासह शाळेतील शिक्षक उपस्थित होते