Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ मुख्य शाखा सोमेश्वर द्वारे 'कारगील विजय दिवस' उत्साहात

सोमेश्वरनगर !  बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ मुख्य शाखा सोमेश्वर द्वारे 'कारगील विजय दिवस' उत्साहात
सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील  आजी माजी सैनिक संघटना (सोमेश्वरनगर ) च्या आजी माजी सैनिक संघटने द्वारे दर वर्षी प्रमाणे  आज  कारगील दिनानिमित्त कारगील विजयोत्सव साजरा केला गेला निवृत्तीनंतर ही सामाजिक उपक्रमात सतत सहभागी असणारी बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना सोमेश्वर द्वारे करंजेपुल पासुन वाघळवाडी व सोमेश्वर कारखाना ते करंजेपुल अशी रॅली काढुन "अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे,""भारत माता कि जय" व जय जवान जय किसान अशा घोषणा देत सोमेश्वर कारखाना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालणेत आला त्यानंतर करंजेपुल येथे  राष्ट्रगीत व शहिदाना श्रद्धांजली वाहणेत आली.
      बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना मुख्य कार्यालय  सोमेश्वरनगर सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,तक्रार निवारण समिती अध्यक्ष ॲड गणेश आळंदीकर,उपाध्यक्ष रामचंद्र शेलार ,भगवान माळशिकारे, सचीव रामदास कारंडे ,कार्याध्यक्ष बाळासाहेब गायकवाड व नितीन शेंडकर, कोषाध्यक्ष किरण सोरटे, उपकोषाध्यक्ष रवींद्र कोरडे,  यांचेसह माजी सैनिक व कारगील विजेता बाळकृष्ण रासकर  ,राजाराम शेंडकर ,मोहन शेंडकर ,ज्ञानेश्वर कुंभार ,माळवाडी चे अनिल  भगवान शिंदे ,अनिल चौधरी ,दत्तात्रय चोरगे ,भारत मदने ,विजय  साबळे,सुभाष गाडे , सुभाष शेंडकर, गणेश शेंडकर, युवराज चव्हाण, महेंद्र चव्हाण आदी माजी सैनिक यावेळी हजर होते .
        सैनिकांच्या या रॅलीला विद्या प्रतिष्ठान ईंग्रजी माध्यम शाळा वाघळवाडी ,कै. हनुमंतराव सावंत उत्कर्ष आश्रमशाळा वाघळवाडी ,सोमेश्वर विद्यालय सोमेश्वर नगर च्या शेकडो  विद्यार्थी वर्गानी व शिक्षकानी रस्त्याच्या बाजुला येवुन शहिदाना मानवंदना देत भारत मातेचा जयजयकार केला .करंजेपुल चौकात झालेल्या कार्यक्रमात प्रास्ताविकमधे गणेश आळंदीकर यानी कारगील दिनाचे महत्व व माहीती दिली  सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यानी शहिदाना श्रद्धांजली वाहत कारगील विजय फक्त पाकिस्तान वर चा विजय नसुन जगामधे भारताची ताकद दाखवणारा विजय होता असे सांगुन सोमेश्वर च्या आजी माजी सैनिक संघाद्वारे कारगीलदिनाची जनजागृती बद्दल व निवृत्तीनंतरही चालु असलेल्या समाजकार्याबद्दल सैनिकांचे आभार मानले. यावेळी करंजेपुल चे सरपंच वैभव गायकवाड ,सोमेश्वर कारखाना उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर ,मा कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड,संचालक शैलेश रासकर , ऋषी गायकवाड व  करंजे शिवसेना विभाग प्रमुख राकेश (बंटी )गायकवाड , नागेश गायकवाड, करंजेगाव माजी उपसरपंच बुवासाहेब हुबरे, करंजे पोलीस पाटील राजेंद्र सोनवणे, हर्षद हुबरे , रणजित हुबरे , दादू मांगडे सोमेश्वरनगर परिसरातील  ग्रामस्थ हजर होते या संघटनेने शेकडो तक्रारी पोलीस ठाणे अथवा कोर्टात न जाता मिटवल्या आहेत तसेच कोव्हीड काळात  सर्वसामान्याना व पुरग्रस्त दरडग्रस्ताना या संघटनेने मोठी मदत केली आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test