लोणंद शहरातील मराठा नागरी पतसंस्थेचा विशेष पुरस्काराने सन्मान
दिलीप वाघमारे
मराठा नागरिक पतसंस्था सहकार चळवळीतील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन नुकताच सन्मान करण्यात आला मराठा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिल राजे निंबाळकर उपाध्यक्ष हनुमंतराव यादव तसेच सर्व सदस्य संचालक कर्मचारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन स्थापनेला तीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सहकार चळवळीत योगदान दिल्याबद्दल सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन व जनता सहकारी बँक लिमिटेड सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कार्यक्रमात नागरी मराठा सहकारी पतसंस्थेला विशेष पुरस्कार देण्यात सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र राज्य सरकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या शुभहस्ते पुरस्कार देण्यात आला यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील प्रमोद आडकर यांची प्रमुख उपस्थिती होती पुरस्काराबद्दल सातारा जिल्ह्यामध्ये सर्वत्र अभिनंदन होत आहे