बारामती ! पाहुणेवाडी च्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी तावरे
बारामती : पाहुणेवाडी (ता.बारामती) च्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी जयराम भगवानराव तावरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी प्रयत्न करून गावांत शांतता राहण्यासाठी तत्पर राहू असे आश्वासन नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष तावरे यांनी दिले. यावेळी ग्रामस्थांनी तावरे यांचा सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सरपंच भगवान तावरे,उपसरपंच राधिका भंडलकर, पोलीस पाटील सुरेश काटे,ग्रामसेविका अवंतीका काळे,शशिकांत तावरे,दत्तात्रय खुडे,शशिकांत चव्हाण,प्रमोद सापते,दीपक सरोदे,संदीप इंगळे,विशाल शिंदे,शिवराज भोसले, ग्रामस्थ उपस्थित होते.