पुणे ! दुपारी १२ नंतर खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून 'मुठा नदी' पात्रामध्ये साधारण ३ हजार ४२४ क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार -
-यो.स.भंडलकर
नदीपात्रात उतरू नये, तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत
पुणे - खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज दुपारी १२ दरम्यान खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये साधारण ३ हजार ४२४ क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. -यो.स.भंडलकर,
सहाय्यक अभियंता, श्रेणी १
खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्पसातारा