Type Here to Get Search Results !

लोणंद ! भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साथ प्रतिष्ठाण वतीने विविध स्पर्धांचे आयोजन

लोणंद ! भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साथ प्रतिष्ठाण वतीने विविध स्पर्धांचे आयोजन
लोणंद - भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साथ प्रतिष्ठाण या सामाजिक संघटनेचे वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दिनांक - 15 आगस्ट पर्यंत लोणंद येथील विविध जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधे लहान गट - पहिली ते दुसरी. मध्यम गट - तिसरी ते चौथी व मोठा गट - पाचवी ते सातवी पर्यंत च्या विद्यार्थ्यांसाठी 1) रांगोळी स्पर्धा, 2) चित्रकला स्पर्धा, 3) सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, 4) निबंध स्पर्धा, 5) वकृत्व स्पर्धा, या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी बक्षीस - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक व सर्टिफिकेट्स देण्यात येणार आहे, विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन साथ प्रतिष्ठाण वतीने करण्यात येत आहे.
तसेच दिनांक - 17 आगस्ट रोजी मालोजीराजे विद्यालय लोणंद पठांगनावर साथ प्रतिष्ठाण, पोलीस स्टेशन लोणंद व मालोजीराजे विद्यालय लोणंद यांच्या संयुक्त विद्यमानाने आमंत्रित खो खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी बक्षीस म्हणून दत्ताभाऊ चषक - प्रथम क्रमांक - 7001 /- व चषक, द्वितीय क्रमांक - 5001 /- व चषक, तृतीय क्रमांक - 3001 /- व चषक, चतुर्थ क्रमांक - 2001 /- व चषक तसेच विविध उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संघांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. तरी या सर्व उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी व स्पर्धकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी लोणंद व पंचक्रोशीतील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे विनंती आवाहन साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test