करंजेपुल येथे रब्बी हंगाम मोहीम प्रशिक्षण अंतर्गत रब्बी वाणचे वाटप
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपुल येथे रब्बी हंगाम मोहीम प्रशिक्षण अंतर्गत रब्बी ज्वारी बियाणे वाण फुले सुचित्रा चे वाटप करण्यात आले. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ऊस व रब्बी ज्वारी पिकांबाबत माहिती दिली... कृषी विभागाच्या योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना कृषी सेवक बोराटे यांनी माहिती दिली.
यावेळी करंजेपुल सरपंच वैभव गायकवाड ,बाळासाहेब शेंडकर,सोपान गायकवाड, शशिकांत गायकवाड,भाऊसाहेब लकडे व शेतकरी बांधव उपस्थित होते.