सोमेश्वरनगर ! मुरूम येथील नवतरुण गणेशोत्सव मंडळ च्या वतीने विविध स्पर्धा व गुणगौरव सोहळा संपन्न.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील नवतरुण गणेशोत्सव मंडळ मुरुम यांच्या वतीने 'गणेशोत्सव 2022' यावर्षी विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वेषभूषा स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, मल्लखांब प्रात्यक्षिक (आनंद गुरुकुल कोल्हापूर) होम मिनिस्टर,भारुड,वृक्षारोपण,आरोग्य शिबीर यांसारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच नवतरुण गुणगौरव सोहळा अजयश्री मल्टीपर्पज हाॅल याठिकाणी संपन्न झाला. यावेळी नवतरुण कृषीभूषण पुरस्कार दिलीप आहिरेकर,नवतरुण कलाभूषण पुरस्कार सचिन सुभाष भिलारे,नवतरुण शिक्षणसेवा भूषण पुरस्कार प्रा. विलास विष्णु बोबडे,नवतरुण आरोग्यसेवा भूषण पुरस्कार . दत्तात्रय तुकाराम शिर्के, तर नवतरुण जीवनगौरव पुरस्कार प्रा .लक्ष्मण एकनाथ जगताप यांना प्रदान करण्यात आले. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष व संचालक राजवर्धनदादा शिंदे, उद्योजक नंदकुमार शिंगटे,रामचंद्र जगताप,विक्रम शिंदे,सिद्धेश्वर कुंजीर,महेश शिंदे,संकेत जगताप,कौस्तुभ चव्हाण ,अमर जगताप,संजय चव्हाण, सुनील शिंदे,उपसरपंच राजेंद्र कदम उपस्थित होते.
नवतरुण गणेशोत्सव मंडळ मुरूम यांच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये वेशभूषा
स्पर्धा लहान गट
प्रथम क्रमांक- उत्कर्ष रुपेश कुमार जगताप
द्वितीय क्रमांक-कु. सई सुधीर भापकर
तृतीय क्रमांक- संकल्प पोपटराव गाडे
■ मोठा गट...
प्रथम क्रमांक- प्रणव प्रमोद शिर्के द्वितीय क्रमांक-कु. ज्ञानेश्वरी अंकुश बुरसे
तृतीय क्रमांक-कु. स्मृतिका पांडुरंग ढवान
■ वकृत्व स्पर्धा लहान गट...
प्रथम क्रमांक-कु. सई गायकवाड
द्वितीय क्रमांक -कु.अक्षरा होळकर
तृतीय क्रमांक-कु. तनिष्का ढवान
■ वकृत्व स्पर्धा मोठा गट...
प्रथम क्रमांक-कु.स्मृतिका ढवान
द्वितीय क्रमांक -कु.ज्योती माने
तृतीय क्रमांक -कु.संस्कृती जगताप
■ होम मिनिस्टर पैठणीचा मान स्वाती अभिमान केंजळे यांना देण्यात आला.