प्रधानमंत्री कुसुम योजना...जाणून घेण्यासाठी सविस्तर...
महाकृषी ऊर्जा अभियान- प्रधानमंत्री कुसुम योजना सौर पंप आणि इतर अक्षय ऊर्जा सयंत्रांच्या स्थापनेसाठी सुरु केली आहे. कृषी क्षेत्राला डिझेलमुक्त करण्यासाठी ही योजना असून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियानात त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना कुसुम योजनेच्या घटक-ब अंतर्गत ९० ते ९५ टक्के अनुदानावर सौरपंप मिळतात.
लाभार्थी निवडीचे निकष:
• शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदीनाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
• पारंपरिक वीज जोडणी नसणारे शेतकरी
• अटल सौर कृषी पंप योजना टप्पा १ व २ किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजूर न झालेले अर्जदार शेतकरी.
• ५ एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती, ५ एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारकास ५ अश्वशक्ती, ५ एकर क्षेत्रापेक्षा जास्त शेतजमीन धारक शेतकऱ्यास भौगोलिक परिस्थितीनुसार मागणी विचारात घेऊन ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय.
लाभाचे स्वरुप...
• सर्वसामान्य शेतकऱ्याचा दहा टक्के लाभार्थी स्वहिस्सा, उर्वरित ९० टक्के अनुदान.
• अनुसूचित जाती,जमातीच्या शेतकऱ्याचा पाच टक्के लाभार्थी स्वहिस्सा, उर्वरित ९५ टक्के अनुदान.
अर्ज करण्याची पद्धत...
https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
या संकेतस्थळ लिंकवर ऑनलाईन पद्धतीने
अधिक माहितीसाठी संपर्क. जवळचे महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी कार्यालय