सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या सायली जगताप हिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील मु.सा काकडे महाविद्यालयाच्या इयत्ता ११वी कला शाखेतील सोनाली नारायण जगताप १७ वर्षे वयोगटात ४६ किलो वजनी गटात पुणे येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. २१ व २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,जलोसा,दिल्ली येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली. महाविद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. पुढील दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी महाविद्यालयाचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश काकडे- देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रमोदकाका काकडे-देशमुख, महाविद्यालयाचे सचिव प्रा.जयवंतराव घोरपडे,सह-सचिव सतीश लकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, व्यवस्थापन समितीचे सदस्य व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत काकडे -देशमुख नितीन कुलकर्णी, संजय घाडगे, ऋषिकेश धुमाळ, महेंद्रसिंह जाधवराव,प्रा सुजाता भोईटे,संकेत जगताप उपस्थित होते. सायली जगताप हिला प्रा.डॉ बाळासाहेब मरगजे, प्रा.दत्तराज जगताप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी NEET परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या बारावी विज्ञान शाखेतील गाडे साहिल जितेंद्र(५८४) व कु.रासकर भाग्यश्री दादासो (४२६) यांचाही गौरव करण्यात आला.