सोमेश्वरनगर ! सेवानिवृत्त सैनिकांनी ...ती फांदी दूर केल्याने अनर्थ टळला...
देशसेवेनंतरही सेवानिवृत्त सैनिकांची निस्वार्थ देशसेवा.
सोमेश्वरनगर - बारामतीतील करंजेपुलं सोमेश्वर मंदिर रस्त्यालगत एका बाभळीच्या झाडाची फांदी अर्धवट कोसळन्याच्या मार्गावर होती . कामानिमित्त या रस्त्यावरून माजी माजी सैनिक संघ अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर व सचिव पंकज कारंडे हे जात असताना त्यांच्या निदर्शनात आल्याने ... त्यांनी तत्काळ आपली दुचाकी थांबवत ... ती फांदी खेचून खाली घेत दूर केली , त्यामुळे मोठा अपघात टळला... मंगळवार रोजी सोमेश्वर करंजेपुल येथे आज मंगळवार रोजी मोठा आठवडे बाजार असतो तर या आठवडे बाजारात शेतमाल विकण्यासाठी मगरवाडी ,चौधरीवाडी, रासकरमळा, देऊळवाडी करंजे ,वाकी, चोपडज ,मुर्टी याभगतील शेतकरी येत असतात तसेच सोमेश्वरनगर हे मोठे शिक्षण संकुलन ,सोमेश्वर कारखाना तसेच मुख्य बाजारपेठ असल्याने या गावांमधून नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने याच रस्त्याने येत असतात .
या रस्त्याला नेहमीच वरदळीचे स्वरूप असते अर्धवट तुटलेली फांदी कोणाच्या तरी अंगावर कोसळली असती तर मोठा अपघात घडण्याची शक्यता होती . माजी सैनिकांनी ते फांदी दूर केल्याने आपल्या दृष्टीने जरी माजी सैनिक सेवानिवृत्त असले तरी त्यांच्या निस्वार्थ देश सेवा पाहायला मिळाली या कामगिरीबद्दल माजी सैनिक शेंडकर व कारंडे यांना नागरिकांनी सलाम करत त्यांचे कौतुक केले.