Type Here to Get Search Results !

जेजुरी ! धरण उशाला कोरड घशाला ; जेजुरीकरांना पाणी मिळेना प्यायला.

जेजुरी ! धरण उशाला कोरड घशाला ; जेजुरीकरांना पाणी मिळेना प्यायला.
पाच दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांच्यात संताप.

जेजुरी दि. (प्रतिनिधी) - तिर्थक्षेत्र जेजुरी शहरात पाच दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने येथील नागरीकांनी नगरपालिका प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे जेजुरी शहरात लवथळेश्वर, विद्यानगर,जुनी जेजुरी परीसरात पाच दिवस पाणी नसल्यामुळे ऐन गौरी गणपती च्या सनाला महिला भगिनींना पाण्यासाठी वणवण करावी लागली आहे अक्षरशः पाणी विकत घेऊन महिला भगिनींना घरातील स्वच्छता व साफसफाई, करावी लागली आहे नाझरे धरण उशाला असून जेजुरीकरांना दिवसाआड पाणीपुरवठा होणे गरजेचे असताना त्यांना चार चार दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे या संदर्भात पाणीपुरवठा करणारे मुकादम राजेंद्र दोडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि लाईट नव्हती, विजेचे खांब पडलेले होते त्यामुळे पाणी पुरवठा करता आला नाही दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबाबत विचारले असता जेजुरी शहराची लोकसंख्या वाढली आहे व पाणी पुरवठा करणारी मोटर लहान असल्याने दिवसाआड पाणीपुरवठा करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले, विद्युत वितरण कंपनीच्या अभियंता यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि विद्युत पुरवठा सुरळीत चालू आहे, एकंदर नगरपालिका प्रशासन व विद्युत वितरण कंपनी नागरीकांना वेठीस धरण्याचे काम करत असल्याचे नागरीकामधुन बोलले जात आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test