कौतुकास्पद ! सायली जगताप हिस "आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक पुरस्कार २०२२" देऊन गौरव.
वडगाव निंबाळकर - बारामती तालुक्यातील होळ येथे रविवारी दि.२५ रोजी आद्यक्रांतीविर राजे ऊमाजी नाईक यांची २३१ वी जयंती जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हाध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.यानिमित्ताने विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार,वृक्षारोपन,शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे साहेब कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होते यावेळी जिल्हा बँकेचे संचालक संभाजी नाना होळकर,सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, माजी उपाध्यक्ष सिद्धार्थ गिते, भाजपा नेत्या संगिताराजे राजेनिंबाळकर,वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे साहेब,आनंद शिक्षण संस्था होळ चे सचिव प्रमोद कुमार गिते,कार्याध्यक्ष संजय जाधव,संचालक प्रविण कांबळे,सरपंच आशा वायाळ, दुध संघाचे संचालक कौस्तुभ चव्हाण,ग्रा.सदस्य छाया भंडलकर,अध्यक्ष लोणारी युवा प्रतिष्ठाण दादासो होळकर,चेअरमन श्रीनाथ पतसंस्था सचिन साठे,बहुजन हक्क परिषद म राज्य उपाध्यक्ष शशिकांत गायकवाड,वाकी चे सरपंच किसन बोडरे,तालुका अध्यक्ष अमोल गायकवाड, उदोजक हिंदुराव सोरेटे,तंटामुक्ती अध्यक्ष गोरख खोमणे,संघटक नरेश खोमणे,योगेश मदने,हरिभाऊ भंडलकर,ऋषि खोमणे,रोहित जाधव,सोमनाथ मदने,जेष्ठ ग्रामस्थ बबनराव भंडलकर,मल्हारी घळगे,उत्तम भंडलकर,विजय वाघमारे, सुधाकर बोकिल,दादासो भंडलकर,शिवाजी लोणकर,शामराव मदने सर,चांगदेव भंडलकर,यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल सन्मानित व्यक्तींना तसेच सोमेश्वरनगर सायली जगताप हीला कुस्तीत अंडरस्वेन्टीन मध्ये ब्रांच पदक मिळाल्याबद्दल आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक पुरस्कार २०२२" देऊन गौरवण्यात आले.
यावेळी दौलत शितोळे,संभाजी होळकर,संगिताराजे राजेनिंबाळकर,संजय जाधव,यांनी मनोगत व्यक्त केले.
जिजामाता हायस्कूल जेजुरी चे प्रा.सागर चव्हाण सर यांचे व्याख्यान पार पडले.
तालुका अध्यक्ष महेंद्र भंडलकर,महिला सचिव सुनिता घळगे,पांडुरंग घळगे,संतोष भंडलकर,विजय भंडलकर,आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते...