सोमेश्वरनगर ! आठवडे बाजारावर धो-धो पावसाचे पाणी.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मंगळवारी करंजेपुल येथे ता ६ रोजी सायंकाळीच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे आठवडेबाजारात ग्राहक, विक्रेत्यांची चांगलीच धांदल उडाली. गणपती स्थापनेपासूनच पावसाला सुरुवात झाली परंतु गेले तीन दिवस पावसाने विश्रांती दिली होती परंतु मंगळावार रोजी सकाळी ऊन पडल्यामुळे नेहमीप्रमाणे मंगळवार आठवडेबाजार भरला होता. सायंकाळी पाच च्या सुमारास पावसाने हजेरी लावली. मुसळधारेमुळे
आठवडेबाजार विस्कळित झाला, तर पावसापासून संरक्षणाकरिता विक्रेते, ग्राहक आडोसा शोधत होते. तसेच विक्रीसाठी आणलेला माल ओला होऊ नये म्हणून धावपळ करीत होते.
या पावसामुळे मंगळवार च्या बाजारात ग्राहक व
विक्रेत्यांची चांगलीच धावपळ झाली. भाजी विक्रेते आपला माल व धान्याचे पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून छत्रीने,प्लास्टिक, बरदानाने झाकण्याचा प्रयत्न करीत होते, तर ग्राहक पाऊस कमी होताच घरची वाट धरत होते. मूटीँ, मगरवाडी, वाकी चोपडज, होळ , सोरटेवाडी , देऊळवाडी, रासकरमळा, माळवाडी गावाकडून आलेला शेतकरी आपला शेतमाल घेऊन गाडीत भरून निघण्याची तयारी करत होता. परिसरातून वाहून आलेल्या पाण्यामुळे परिसर जलमय
झाला होता. त्यामुळे यातून वाट काढणारे दुचाकीस्वार व पायी जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच फजिती झाली.
धो धो पावसामुळे मेन रोडवर ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांची चांगलीच कसरत झाली. सोमेश्वर कारखाना ,मुख्य बाजारपेठ करंजेपुल व मोठे शिक्षण संकुलन असल्यामुळे या करंजेपुल-सोमेश्वरमंदिर मेन रोड वर्दळीचे ठिकाण आहे तसेच मंगळावर झालेल्या पावसामुळे या मेन रोडलगत, तसेच करंजे ओढा पावसाच्या पाण्याने वाहत होता. मोठ्या प्रमाणात
पाणी साचल्यामुळे मेन रोडला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. दुचाकीवरून मार्ग काढताना नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. पादचाऱ्यांना पाण्यापासून बचाव करताना चांगलीच कसरत करावी लागत होती.
ओढ दिलेल्या पावसाने आणि सततच्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या सोमेश्वरकररांनी मात्र दिलासा मिळाला तर शेतातील उभ्या पिकांना याचा नक्कीच फायदा होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे.