सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मु.सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर, राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने पुनीत सागर अभियानांतर्गत शनिवार दि.२५ रोजी पुरंदर तालुक्यातील निरा शहराजवळील दत्त घाट येथे नीरा नदी काठी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नीरा नदीच्या काठावर असलेला प्लास्टिक कचरा राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी संकलित केला व अशा कचऱ्याची विल्हेवाट लावली. सदरच्या अभियानात राष्ट्रीय छात्र सेनेचे ४० कॅडेट्स सहभागी झाले होते. या अभियानाचा मुख्य उद्देश हा मानवनिर्मित कारणांमुळे नद्यांचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे व समाजामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करणे असा होता. १ महाराष्ट्र सिग्नल कंपनीचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल प्रवाल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या अभियानाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. सदरच्या अभियानास संस्थेचे अध्यक्ष सतीशराव काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे- देशमुख, सचिव जयवंत घोरपडे, सहसचिव सतीश लकडे यांनीही शुभेच्छा दिल्या. या अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी एन.सी.सी. चे ऑफिसर लेफ्ट. श्रीकांत घाडगे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ.बाळासाहेब मरगजे, प्रा. नामदेव जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.
सोमेश्वरनगर ! पुनीत सागर अभियानांतर्गत नीरा नदीची स्वच्छता
September 24, 2022
0
सोमेश्वरनगर ! पुनीत सागर अभियानांतर्गत नीरा नदीची स्वच्छता
Tags