महत्वाची सूचना ! "भाद्रपती बैलपोळा" मिरवणूक लम्पी चर्मरोगामुळे रद्द-दादासाहेब कांबळे
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, राज्यात लम्पी चर्मरोग हा विषाणूजन्य सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव केवळ गोवंशीय पशुधनात आढळून आलेने लम्पी चर्मरोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मा.प्रांताधिकारी सो बारामती यांच्या आदेशान्वये रविवार दिनांक २५/०९/२०२२ रोजी होणारा "भाद्रपदी बैलपोळा" सण सार्वजनिकरित्या साजरा करता येणार नाही. बैलांची एकत्रितरित्या मिरवणूक काढता येणार नाही. याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.