सोमेश्वर मंदिर रस्त्यावर कोसळले...ते झाड त्वरित हटवावे ...ग्रामस्थांची मागणी
सोमेश्वरनगर - बारामतीतील सोमेश्वर मंदिर करंजे येथे रस्त्यावर काल मंगळवार दि ६ रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे झाड यशवंतराया मंदिर नजीक येथे कोसळले आहे . सोमेश्वर कारखाना व करंजेपुल मुख्य बाजारपेठ,हॉस्पिटल व मोठे शैक्षणिक संकुलन असल्यामुळे सोमेश्वर परिसरातील करंजे ,देवळवाडी,रासकरमळा ,माळवाडी ,चौधरवाडी,मगरवाडी, वाकी, चोपडाच,मुटीँ या भागातून अनेक नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी यांना याच मार्गाचा अवलंब करावा लागतो ,रात्रीच्या झालेल्या वाऱ्यासह पाऊसाने या मार्गावरमधोमध मोठे झाड कोसले असून प्रवाशांना कडेने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे... ते झाड संबधित प्रशासनाने त्वरित हटवावे अशी मागणी सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिकांसह करंजे ग्रामस्थांनी केली आहे.