पितृपक्षात नागरिकांच्या खिशाला झळ; भाजीपाल्याचे भाव कडाडले
फोटो ओळ - पितृ पंधरवडा असल्या ने भाजीपाल्यांचे भाव वाढलेले आहे हेेेे समजून सांगत विक्री करणारेेे - भाजी विक्रेता सागर मंगरूळे
सोमेश्वरनगर - पितृ पंधरवड्यात पूर्वजांना पितर घालण्यात येतात. यासाठी नैवेद्य घालतात, म्हणून सध्या भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. बारामतीतील करंजेपुल येथे दर मंगळवार चा आठवडे बाजार असतो शेजारील दहा ते बारा गावांमध्ये हा मुख्य बाजार असतो. बाजार निमित्त आलेल्या सगळ्याच महिला , नागरिकांनी या वेळी भाजीपाला चांगलाच कडाडला आहे. यामुळे भाजीपाला घेताना हात आखडता घ्यावा लागत आहे. असे म्हणत का होईना बाजार केला...भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. जेष्ठ नागरीकांनी व मिळालेल्या माहितीनुसार पितृ पक्षात दिवंगत पूर्वज पृथ्वीवर येतात, असा समज आहे, म्हणून त्यांची पूजा केली जाते. पितृ पक्षात पूर्वजांचे स्मरण करून त्यांचे श्राद्ध करण्यात येते, यासाठी नवनवीन पदार्थ बनवून नातेवाइकांना भोजनास बोलविले जाते. यामुळे भाजीपाला मागणी असते.
पूर्वी या कार्यक्रमाला प्रतिष्ठित व भाऊबंदांना भोजनासाठी बोलविण्यात येत होते. मात्र, धावपळीच्या युगात हा कार्यक्रम घरच्या घरीच करण्यात येतो किंव्हा एखादा जवळचा येणार पाहुणा किंव्हा मित्र बोलावलं जातो.
प्रत्येकी भाजीपाला त्यामध्ये गवार : गिलके, दोडके, कारले, भेंडी , मिरची ,कोथिंबीर, वांगे, फुलावर ,कोबी , चवळी, अळूची पाने जुडी - कढीपत्ता ,फळ डाळींब, पेरू यांचे दर नेहमी पेक्ष्या दहा-वीस रुपयांनी जास्त आहे.
----------------------------------------
''पितृ पंधरवड्यात काही प्रमाणात भाजीपाला महाग असला, तरी पूर्वजांना भोजन देणे महत्त्वाचे असते. महागाईमुळे खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत आहे.
ग्राहक लक्ष्मण रासकर,करंजे
--------------------------------------------
'भाजीपाला महागला असला तरी ग्राहक खरेदीसाठी येत आहेत. पितृ पक्ष महत्त्वाचा कालखंड असतो. वांगे, चक्की, चवळी महाग असल्याने ग्राहक कमी प्रमाणात घेतात.''
सागर मंगरूळे, भाजीपाला विक्रेते