सोमेश्वरनगर ! बॅटरी चोरी गुन्हा बारा तासात उघड मुददेमालासह आरोपींना अटक; वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची दमदार कारवाई.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील करंजेपुल गावचे हृददीत कंरजेपुल ते सोमेश्वर मंदिर
रोडलगत पत्र्याचे गाळेमध्ये येथे दि. १५ रोजी २०:३० वा ते दि. १६ रोजी सकाळी
०८:३० चे सुमारास फिर्यादींचे सोमश्वर अॅटो इलेक्टिक बॅटरीचे दुकानचे दरवाजाचे कड़ी कोयंडा तोडुन दुकानातुन १ लाख ५२ हजार ३२८/- रूपये किंमतीच्या वेगवेगळया कंपनीच्या इलेक्ट्रिक बॅटऱ्या अज्ञात चोरटयाने चोरी करून
नेले आहे. सदर बाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३२७ / २०२२ भादवि ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील मुददेमाल हा हातगाडीवर भरून दुकानपासुन दर अंतरावर घेऊन अज्ञात वाहनातुन घेऊन गेले होते. सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे शोध घेत सदर गुन्हयातील आरोपी व मुददेमाल हे बोलेरो
पिकअप वाहनातुन घेऊन गेले असलेचे निष्पन्न झाले, सदर गुन्हयाचा शोध हा सी सी टी व्ही फुटेज व गोपणीय माहीतीच्या आधारे माहीती घेत मिळाली की कोन्हाळे बु॥ येथील एका वस्ती वरील घराजवळ बोलेरो पीक अप वाहन व संशईत आरोपी असल्याची खात्रीशिर माहीती मिळाली सदर ठिकाणी जाऊन संशईत आरोपी नसरूददीन हिरामन भोसले याला ताब्यात घेऊन त्याचेकडे कसुन चौकशी केली असता त्याने त्याचे इतर साथीदारांसोबत सदर चा गुन्हा केले असल्याचे कबुल केले. सदर गुन्हयाचे कामी १) नसरूददीन हिरामन भोसले वय २० वर्षे रा
पानगेवस्ती कोऱ्हाळे बु।। ता बारामती २) संतोष आसाराम माळी रा पानगेवस्ती कोन्हाळे बु ता बारामती व चोरीचा माल घेणारे ३)सुनिल लाला निंबाळकर रा लासुर्णे ता इंदापुर जि पुणे ४) प्रितम शांतीलाल गांधी रा लासुर्णे ता इंद्युपर जि पुणे यांना गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली आहे. त्यांचे कडुन सदर गुन्हयात चोरी गेलेला मुददेमाल जप्त करण्यात आला असुन गुन्हयात वापरलेले पिकअप वाहन जप्त करण्यात आली आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मा. डॉ. अभिनव देशमुख सो पुणे ग्रामीण पोलीस, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते सो. बारामती विभाग बारामती, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे सो
बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोसई योगेश शेलार, पोहबा अनिल खेडकर, पोहवा महेंद्र फणसे, पोना अमोल भोसले, पोना
सागर देशमाने, पोना हृदयनाथ देवकर, पोना कंडलिक कडवळे, पोना भाउसाहेब मारकड, पोना सागर चौधरी, पोशि. महादेव साळुंखे, पोशि पोपट नाळे, पोशि अमोल भुजबळ यांनी केली. पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार हे करीत आहेत.