शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, पी ई सोसायटीचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव उपस्थित होते.
मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा हा शैक्षणिक धोरणाचा हेतू असल्याचे यावेळी श्री.केसरकर यांनी सांगितले.
यावेळी आमदार शिरोळे, कार्याध्यक्ष प्रा. डाॅ गजानन एकबोटे यांनी मनोगत व्यक्त केले.
मंत्री केसरकर यांच्या हस्ते 'ज्ञानमय' या आरोग्यविशेष संशोधनपर जर्नलचे प्रकाशन करण्यात आले.
शिक्षण विभागातील अधिकारी तसेच पी ई सोसायटीच्या सर्व संस्थामधील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.