बारामती ! वन्यप्राण्याबाबत माहितीपर चित्रफित दाखवत जनजागृती.
बारामती - वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती यांचे कार्यालय दि. १३.०९.२०२२ रोजी चिता हा वन्यप्राणी भारतात reintroduce करणेबाबत वनपरिक्षेत्र बारामती।मधील मौजे.शिर्सुफळ येथील श्री.शिरसाई विद्यालय शिर्सुफळ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंडवेवाड़ी मध्ये चिता या वन्यप्राण्याबाबत माहितीपर छायाचित्रे, चित्रफित दाखवून तसेच पोस्टर लावून जनजागृती केली व आपल्या भारतामध्ये दि. १७.०९.२०२२ रोजी चित्याचे आधिवास निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतं आहेत. सदर जनजागृती मा. मुख्यवनसंरक्षक एन. आर. प्रविण सो. व मा. उपवनसंरक्षक पुणे राहुल पाटील सो. यांच्या मार्गदर्शनात व मा. सहाय्यक वनसंरक्षक मथुर बोठे सो. व वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती शुभांगी लोणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यावेळी
विद्यार्थ्यांना चिता या वन्यप्राण्याचे पर्यावरणातील महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बारामती वनपरिक्षेत्र अंतर्गत इतर 15 शाळांमध्ये चिता या वन्यप्राण्याबद्दल माहितीपर पोस्टर लावण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र बारामती येथील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच जि.प. शाळा मधील सर्व शिक्षक कर्मचारी तसेच मुले
उपस्थित होते.