मुसळधार पाऊसाने बाजरी पिक भुहिसपाट.. .. त्वरित पंचनामे करण्याची मागणी
मुसळधार पाऊस झाल्याने शेतीपिके धोक्यात आले आहे.
सोमेश्वरनगर - मुसळधार पावसाने शेतकऱ्याच्या बाजरी, सोयाबीन, मकाचे पाणी साचल्याने नुकसान झाले असून, पिके भुहिसपाट या वातावरणामुळे शेती आणि शेतकरी दोन्ही संकटात सापडले आहेत. या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणीने जोर धरला आहे.
सुपा, मोरगाव, मुर्टी,चौधरवाडी ,करंजे ,करंजेपुल, निबुत, खंडोबाचीवाडी ,वाघळवाडी,मुरूम वाणेवाडी,सोरटेवाडी, होळ, वडगाव ,वाकी, चोपडज या भागातील गावात सोयाबीन, मका, बाजरी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे सोयाबीन, बाजरी, मका पिकांना महिन्याततच काढणीच्या मार्गावर असून हाताशी आलेला घास गेला आहे. जोराच्या या पावसाचा ऊस पिकांना फायदा होणार असला तरी या पावसाचा सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी सह तरकरी अशा बहरलेल्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
.........
रब्बी हंगामातील पिकांसाठी हा पाऊस जरी उपयोगी असला तरी खरिपातील पिके हाता-तोंडाशी आल्यानंतर सतत पडणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सलग दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या संबधित प्रशाशने नुकसानीचे पंचनामे करावेत.
शेतकरी - तानाजी गायकवाड, करंजेपुल