वीरशैव लिंगायत धर्माचे जगद्गुरूंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट
दिल्ली - सोमवार १७ रोजी सायं.५ वाजता भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांना जानेवारी महिन्यात श्रीशैल्य पिठामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण श्री शैल्य जगदगुरू श्री श्री श्री १००८ डॉ.चनसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी व डॉ. शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज यांनी दिले. यांच्या समवेत केंद्रीय संसदीय मंत्री ना. प्रल्हाद जोशी उपस्थित होते. मा. पंतप्रधान मोदीजीनी निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आनंदाने होकार दिला.
श्रीशैल्य जगदगुरु श्री श्री श्री १००८ डॉ.चनसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजींनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजीसोबत वीरशैव लिंगायत समाजातील विविध समस्यांवर व देशातील विविध प्रश्नांवर तब्बल २० मिनिट विस्तृत चर्चा केली.