बारामती ! श्लोक दोशीला अंतरराष्ट्रीय चार सुवर्ण पदके.
स्केटिंग मध्ये बारामती चे नाव साता समुद्रापलीकडे...
बारामती - बारामती येथील श्लोक अभिनंदन दोशी (खटावकर ) हा जनहित प्रतिष्ठान बारामती दहावीचा विद्यार्थी असून याने मालदीव येथे आयोजित करण्यात आलेल्या अंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेत भारताकडून टिम स्पोर्टस एल.यु. पी.इंडिया तर्फे सहभागी झालेल्या श्लोक याने अंडर १७ या वयो गटात चार सुवर्ण पदके जिंकून देशाची मान उंचावली आहे.२४ व २५ सप्टेंबर २०२२ रोजी मालदीव ची राजधानी माले सिटी व हुलहू माले सिटी येथे रोलर स्केटिंग असोसिएशन ऑफ मालदीव स्केटिंग फ़ेडरेशन २०२२ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतासह अनेक देशातील १२३ खेळांडुनी सहभागी घेतला होता.
श्लोक ने १०० मी. ५०० मी. १०० मी.५०० मी. स्पीड स्केटिंग रेस मध्ये चार सुवर्ण पदक पटाकावले. त्याने १०० मीटर अंतर ९ सेकंद मध्ये पार केले आहे. मालदीव ऑलम्पिक कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद अब्दुल सत्तार ,माजी ऑलम्पिक कमिटी अध्यक्ष इब्राहिम इस्माइल , स्पोर्ट्स मिनिस्टर गव्हरमेंट ऑफ मालदीव उपमंत्री व अध्यक्ष महंमद अजमीत तसेच टिम स्पोर्ट्स एल.यु.पी.इंडिया चे अध्यक्ष वैभव बिळगी सर यांच्या हस्ते श्लोक ला सुवर्णपदके व प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले.
श्लोक ने आता पर्यंत राष्ट्रीय तथा अंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमधून १६ गोल्ड ,६ सिल्वर, ५ ब्रॉन्ज पदके जिंकली आहेत. तसेच त्याच्या नावावर नामांकित ५ बुक ऑफ रिकॉर्ड रजिस्टर आहेत. त्याच्या या यशा करता त्याची जिद्द व धडाडी आई, वडील, दोशी कुटुंबीय यांचे प्रोत्साहन आणि त्याचे प्रशिक्षक विजय मलजी , उमर पठान, प्रणाली पवार यांच्या मार्गदर्शना खाली प्रशिक्षण घेत असुन त्यात विजय सर यांचा त्याच्या यशा मध्ये सिंहाचा वाटा आहे. श्लोक याने ४ सुवर्ण पदके जिंकूण आपल्या भारत देशासाठी आणि बारामती साठी अभिमानास्पद अशी कामगिरी केली आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.