बारामतीत वन्यजीव संरक्षण या विषयी जनजागृतीपर पथनाट्य आयोजन.
बारामती - वन्यजीव साप्ताहानिमित पुणे वनविभागांतर्गत वनपरिक्षेत्र - बारामती मध्ये वनविभाग, बारामती Cyce Cub व मोरगाव Cycle Club यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दि 2 रोजी बारामती नगरपरिषद-कन्हेरी वनउद्यान -श्री. मारुती मंदिर कन्हेरी व श्री. मयुरेश्वर मंदिर ते मयुरेश्वर अभयारण्य अशा दोन जनजागृतीपर Oyrolte ralley चे आयोजन करण्यात आले. तसेच यावेळी श्री. मारुती मंदिर कन्हेरी येथे वन्यजीव संरक्षण या विषयी जनजागृतीपर पथनाट्य आयोजन करण्यात आले. यावेळी Environmental Forum of India च्या अध्यक्षा मा. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यात होणार्या पथनाट्य कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रम मा.मुख्यवनसंरक्षक एन. आर. प्रविण सो. व मा. उपवनसंरक्षक पुणे राहुल पाटील सो. यांच्या मार्गदर्शनात व मा. सहाय्यक वनसंरक्षक मयुर बोठे सो. व वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती शुभांगी लोणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी वनपरिक्षेत्र बारामती येथील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच Cycle club चे सदस्य आणि कन्हेरी ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सायंकाळी श्री. आसमाई माता मंदीर, पणदरे येथे वनविभाग, Environmental Forum of India आणि पणदरे ग्रामविकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने चिंकारा संवर्धन याविषयी पथनाट्य सादर
करण्यात आले.